Vidhan Sabha 2019 : भाजपच्या 'या' नेत्याची आमदारकी जाणार!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

विनयभंगप्रकरणी पोलिसांकडून निष्पक्ष तपास झाला नाही. म्हणून नाराज झालेले भाजप आमदार चरण वाघमारे यांनी जामीन घेण्यास नकार दिला. त्यानंतर आता न्यायालयाने वाघमारे यांना दहा ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

भंडारा : विनयभंगप्रकरणी पोलिसांकडून निष्पक्ष तपास झाला नाही. म्हणून नाराज झालेले भाजप आमदार चरण वाघमारे यांनी जामीन घेण्यास नकार दिला. त्यानंतर आता न्यायालयाने वाघमारे यांना दहा ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगाच्या गुन्ह्याखाली चरण वाघमारे यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांद्वारे निष्पक्ष तपास न झाल्याने नाराज होऊन विनयभंगप्रकरणी जामीन घेण्यास नकार दिला. त्यानंतर आता तुमसर न्यायालयाने दहा ऑक्टोबरपर्यंत चरण वाघमारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता आमदार वाघमारे यांचा तुरुंगात मुक्काम राहणार आहे.

Vidhan Sabha 2019 : पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले...

भाजपच्या नाराज नेत्यांनी तिकीट कापण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचा आरोप चरण वाघमारे यांच्या समर्थकांनी केला असून, त्याचा निषेध म्हणून उद्या तुमसर मोहाडी बंदची हाक वाघमारे समर्थकाने दिली आहे. या घटनेमुळे भाजप पक्षात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर असल्याने आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जेव्हा भावूक झालेल्या अजित पवारांना भुजबळ धीर देतात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charan Waghmares Membership of Maharashtra Legislative Assembly may go soon