Vidhan Sabha 2019 : पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले...

टीम ई-सकाळ
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

सरकारने खटला दाखल केला नाही. एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली. तसेच ईडीलाही सरकारकडून तसे सांगितले गेले नाही.

- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

मुंबई : राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह इतर काही जणांची नावे आल्यानंतर मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर चर्चा केली. याप्रकरणी सरकारने खटला दाखल केलेला नाही. एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) स्पष्टीकरण दिले.

भाजपच्या महासंपर्क अभियानात चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, बँक गैरव्यवहार प्रकरणी मी आणि मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा केली. सरकारने खटला दाखल केला नाही. एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयीय प्रक्रिया सुरु झाली. तसेच ईडीलाही सरकारकडून तसे सांगितले गेले नाही. ईडीने स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सरकारचा कोणताही सहभाग नाही. कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाही. न्यायालयाने दिलेला हा आदेश आहे. भाजप आणि सरकारचा यामध्ये कोणताही संबंध नाही आणि सरकारची यामध्ये काही भूमिकाही नाही. याचिकाकर्त्याची ही मागणी आहे. त्यानुसार ही कारवाई केली जात आहे.

अजित पवार नाव नसते तर गुन्हा दाखल झाला नसता : अजित पवार

प्रत्येकाला 300 फुटांपर्यंत घर

आम्ही राज्यात दुष्काळमुक्तीचा संकल्प केला आहे. तसेच राज्यातील प्रत्येकाला 300 फुटांपर्यंत घर मिळायला हवे. महाराष्ट्रात एकही घर राहता कामा नये, ज्याच्याकडे शौचालय नाही, गॅस कनेक्शन नाही, असेही ते म्हणाले.

याबद्दल मी सर्वांची माफी मागतो : अजित पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is no connection of government with ED Inquiries says chandrakant patil Maharashtra Vidhan sabha 2019