Charity Inspector Recruitment 2026
esakal
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील धर्मादाय निरीक्षक पदासाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचूनही निवड झालेल्या उमेदवारांच्या हातात अद्याप नियुक्ती आदेश आलेले नाहीत. निकाल लागून आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होऊन तब्बल तीन महिने उलटले असतानाही शासनाकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी वाढत आहे.