esakal | चव्हाण आणि मुंडेंचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj-and-Dhananjay

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्‍तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा आहे.

चव्हाण आणि मुंडेंचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्‍तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चव्हाण आणि मुंडे यांच्या नावाला दोन्ही काँग्रेसमध्ये पसंती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात या दोन नेत्यांचा समावेश होणार नसल्याचे दोन्ही पक्षांतील सूत्रांकडून सांगण्यात येते.

संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत रद्द 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह या तीन पक्षांच्या सहा मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला होता. यानंतर आठवडाभराचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनही पार पडले. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शपथ घेतली. त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांची निवड करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचा निर्णय दिल्लीतील हायकमांड घेत असते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय अध्यक्ष शरद पवार घेत असतात. काँग्रेस पक्षात पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद सांभाळावे, असे काँग्रेस हायकंमाडला वाटते. तर राष्ट्रवादीत संघटनात्मक पातळीवर बहुजन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आक्रमक धनंजय मुंडे पक्षविस्तारासाठी उपयुक्‍त ठरू शकतात, अशी अटकळ राष्ट्रवादीकडून बांधली जात आहे.