नोकरीच्या अमिषातून फसवणूक! वैद्यकीय शिक्षण संचालक,‌ अधिष्ठातांचे बनावट नियुक्तीपत्र

संशयित आरोपी आशुतोष जोशी याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती मिळाल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र व अंतर्गत पदस्थापनेबाबत डॉ. वैशंपायन स्मृती महाविद्यालय, सोलापूर यांचे पत्र पाठविले.
crime news
crime news esakal

सोलापूर : ‘मी वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत उस्मानाबाद मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीला असून, माझ्या खूप ओळखी आहेत. मी नोकरी लावतो’ असे सांगून आशुतोष उमाकांत जोशी (रा. नेताजी सुभाषचंद्र हाउसिंग सोसायटी, विजयपूर रोड) याने दोन लाख १५ हजार ५०० रुपयाला फसविल्याची फिर्याद सुवर्णा अमित अभ्यंकर (रा. जुळे सोलापूर, विजयपूर रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. आशुतोष जोशीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

उस्मानाबाद येथे नवीन मेडिकल कॉलेज सुरू झाले आहे. त्या ठिकाणी रिक्त जागा आहेत, पण त्यासाठी दोन लाख रुपये लागतील, असे आशुतोष जोशी याने सुवर्णा अभ्यंकर यांना सांगितले. त्यावेळी नोकरीला लागेल म्हणून फिर्यादीने एक लाख रुपये असल्याचे सांगितले. पण, दोन लाख रुपये द्यावेच लागणार असल्याने व जागा खूप असल्याने अजून कोणाला नोकरी हवी आहे का, अशी विचारणा संशयित आरोपी जोशी याने फिर्यादीकडे केली. आशुतोष जोशी हा फिर्यादीचे दीर संतोष जयंत अभ्यंकर यांच्या ओळखीचा होता. जून २०२१ मध्ये त्याची सुवर्णा यांच्याशी ओळख झाली होती. त्यातून जोशीने नोकरीचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्यांचा भाऊ अजय रामभाऊ हांडेकर (रा. ठाणे) याला नोकरीची गरज असल्याचे सांगितले आणि त्याच्याशी संपर्क साधला. दोघांचे मिळून दोन लाख १५ हजार ५०० रुपये आशुतोष जोशीने घेतले, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक सुराज मुलाणी तपास करीत आहेत.

बनावट प्रमाणपत्रांची होणार पडताळणी

फिर्यादी सुवर्णा अभ्यंकर व त्यांचा भाऊ अजय हांडेकर यांच्या व्हॉट्‌सॲपवर संशयित आरोपी आशुतोष जोशी याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती मिळाल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र व अंतर्गत पदस्थापनेबाबत डॉ. वैशंपायन स्मृती महाविद्यालय, सोलापूर यांचे पत्र पाठविले. परंतु, प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नव्हते, हे पुन्हा उघड झाले आणि सुवर्णा अभ्यंकर यांनी पोलिस ठाणे गाठले. आता ती दोन्ही प्रमाणपत्रे कुठून बनवून घेतली, कोणी तयार केली, याचा शोध पोलिस करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com