'त्यांचा' सनातनशी संबंध नाही : चेतन राजहंस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नालासोपारा येथे स्फोटके सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या लोकांचा सनातनशी कुठल्याही प्रकारचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण आज सनातनतर्फे मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देण्यात आले आहे. पत्रपरिषदेत सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस हे बोलत होते. तसेच, त्यांनी सनातनबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचेही सांगितले आहे आणि याबाबत सनातन कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबई : नालासोपारा येथे स्फोटके सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या लोकांचा सनातनशी कुठल्याही प्रकारचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण आज सनातनतर्फे मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देण्यात आले आहे. पत्रपरिषदेत सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस हे बोलत होते. तसेच, त्यांनी सनातनबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचेही सांगितले आहे आणि याबाबत सनातन कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तसेच, कुठल्याही तपासात सनातनचं नाव थेटपणे आलेले नसताना सनातनची काही लोक जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सगळ्या बातम्या सोशल मिडीयातून जाणीवपूर्वक फिरवल्या जात आहेत. सनातनची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा हा डाव आहे, असेही त्यांनी सांगितले. 

त्यानंतर, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये हात असलेल्या आरोपींना अटक करण्यात आलेल्या अटकेनंतर या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 

मराठा आंदोलन तसेच ईद दरम्यान स्फोट घडवण्याचा सनातनचा हेतू होता, असा करण्यात आलेला आरोप धादांत खोटा आहे, असेही राजहंस यांनी सांगितले.  हे सगळे सनातनच्या विरोधकांचे सनातला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे असे स्पष्टीकरणही त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिले. 

Web Title: chetan rajhans denies alligation Nalasopara case