Free Chhaava Movie Screenings for Women in Ahilyanagar : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'छावा' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या तीन चार दिवसांत या चित्रपटाने मोठी कमाई करत नवा रेकॉर्डही बनवला आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण भावूक होताना दिसून येतो आहे. अनेक जण विक्की कौशलच्या अभिनयाचं कौतुक करतो आहे.