esakal | 'बिचारे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री', नाशकात छगन भुजबळांचं वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

'बिचारे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री', नाशकात छगन भुजबळांचं वक्तव्य

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक : नाशकात महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था अर्थात ‘मित्रा’च्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit pawar) यांची ऑनलाइन उपस्थित होती, तर राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री छगन भुजबळ (minister chhagan bhujbal) हे देखील उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा 'बिचारे' असा उल्लेख करताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मात्र, संदर्भ लक्षात येताच सर्वच शांत झाले.

हेही वाचा: नुकसानभरपाईत कुणावरही होणार नाही अन्याय - भुजबळ

छगन भुजबळ यांनी संस्थेचे नाव 'मित्रा' आणि पंतप्रधान नेहमी आपल्या भाषणात वापरत असलेला शब्द 'मित्रों' यावर देखील टीप्पणी केली. 'मित्रा' हे संस्थेचं नाव मला खूप आवडलं. आपले पंतप्रधान वारंवार भाषणात 'मित्रों' असं बोलत असतात. त्यांच्यामुळे हा शब्द प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे आता आपली मित्रा हे संस्था देखील नाव उंचावेल, असंही भुजबळ म्हणाले.

''जगात ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न गंभीर आहे. त्याबाबत सर्वांना वारंवार इशारा दिला जात आहे. कुठे पाऊस पडतो, तर कुठे पाऊस पडत नाही. पाऊस पडला तर सर्वच वाहून जातोय. कुठे दुष्काळ असतो, कुठे ओला दुष्काळ पडतो. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. परिणामी शेतकऱ्यांवर संकट ओढावते. इकडूनही फटका बसतो, तिकडूनही फटका बसतो. बिचारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काम करत आहेत. मात्र, याला फक्त ग्लोबल वार्मिंग जबाबदार आहे, असे भुजबळ म्हणाले.

मी मुंबईचा महापौर होतो. त्यावेळी लाखो टन कचरा कुठं टाकायचा आहे हा प्रश्न होता. मात्र, आता नाशिक, पुणे सर्वच शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या घराजवळ कचरा नको यावरून भांडण होतात. आता कचऱ्यांच करायचं काय? असा प्रश्न आहे. त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, असेही भुजबळ म्हणाले.

loading image
go to top