कानाचे दडे बसतील आता तयारी ठेवा; चित्रा वाघ यांचा इशारा

यशोमती की अल्पमती म्हणू शकते, पण...
chitra wagh criticism on yashomati  thakur
chitra wagh criticism on yashomati thakurEsakal

नावाची मोडतोड करण्यात काय अक्कल लागते यशोमती ताई. मीही तुम्हाला यशोमती की अल्पमती म्हणू शकते, पण म्हणणार नाही. संस्कार आड येतात असा टोला भाजपाच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे.

chitra wagh criticism on yashomati  thakur
मुंबईच्या एसीमध्ये बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळाची झळ नाही-सदाभाऊ खोत

यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना चित्रा वाघ म्हणाल्या, तुमच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा आवाज कानठळ्या बसवणारा आहेचं. कानाचे दडे बसतील आता तयारी ठेवा. कारण आम्ही जनतेच्या आवाजात आवाज मिसळलाय असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

Summary

तुमच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा आवाज कानठळ्या बसवणारा आहेचं. कानाचे दडे बसतील आता तयारी ठेवा.

काय म्हणाल्या चित्रा वाघ

नावाची मोडतोड करण्यात काय अक्कल लागते @AdvYashomatiINC ..ताई.

मीही तुम्हाला यशोमती की अल्पमती म्हणू शकते... पण म्हणणार नाही…संस्कार आड येतात…

तुमच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा आवाज कानठळ्या बसवणारा आहेचं..कानाचे दडे बसतील..तयारी ठेवा. कारण आम्ही जनतेच्या आवाजात आवाज मिसळलाय...

राज्य सरकारच्या कारभारावरून राजकीय वातावरणात तापत चालले आहे. राजकीय कुरघोड्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचार सभेत दगडफेक झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्यावरही टीका केली होती. दरम्यान आज त्या पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा कोल्हापुरात महाविकास आघाडी विरोधात टीकास्त्र सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com