आम्हाला अर्थखातंच पाहिजे, विलंब योग्य नाही,'वर्षा'वर बैठकीनंतर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं; मुख्यमंत्री काय म्हणाले?

Chhagan Bhujbal on Finance Minister राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळावं या मागणीसाठी मंत्री भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणीस यांची भेट घेतली.
Chhagan Bhujbal on Finance Minister

Chhagan Bhujbal on Finance Minister

Esakal

Updated on: 

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे अर्थखाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसला हे अर्थखातं मिळालेलं नाही. ते मिळावं या मागणीसाठी मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार धनंजय मुंडे आणि जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना मंत्री भुजबळ यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळावं, ही आमची ठाम मागणी आहे. बरेच दिवस झाले, आता अर्थखातं आम्हाला दिलं पाहिजे. याबाबत आमच्यात आणि आमदारांमध्येही चर्चा होत असते. हे योग्य नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com