esakal | छगन भुजबळ यांनी घेतली फडणवीसांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

छगन भुजबळ यांनी घेतली फडणवीसांची भेट

छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस आणि समीर भुजबळ यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

छगन भुजबळ यांनी घेतली फडणवीसांची भेट

sakal_logo
By
सूरज यादव

मुंबई - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याची माहिती छगन भुजबळ यांनी ट्विटरवरून दिली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट झाल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेसुद्धा उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी स्थगित केले आहे. याविरोधात भाजपने राज्यभरात आंदोलनसुद्धा केलं होतं. त्यानंतर आता या संदर्भात भुजबळ यांनी फडणवीस यांची भेट घेतली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. ट्विटरवर छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस आणि समीर भुजबळ यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा: राज्याने प्रस्ताव दिल्यास पिकविमा भरण्यास मुदतवाढ- दानवे

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक बुधवारी पार पडली. यात ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीला मागासवर्ग आयोगाचे सदस्य उपस्थित होते. त्यानंतर भुजबळ-फडणवीस भेट झाली आहे.

राज्य सरकारने केंद्राकडे ही माहिती देण्याची मागणी केली होती. परंतु, केंद्राकडून ओबीसींचा डेटा प्राप्त झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत २९ जून रोजी अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचा: '.... अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू'' ;संभाजीराजे

भुजबळ यांनी जूनमध्ये समता परिषदेच्या बैठकीत म्हटलं होतं की, ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा परिणाम राज्यावर नाही तर देशात होणार आहे. यासाठी सर्व ओबीसी संघटनांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रायोगिक आकडेवारीची (इंपेरिकल डेटा) मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने ती माहिती दिली नाही. केंद्राने ही माहिती देण्याची गरज होती असंही भुजबळ याआधी म्हणाले होते.

loading image