राजकारणात सक्रिय होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या घरी (सिल्व्हर ओक) ही भेट झाली. त्यानंतर भुजबळ यांनी राजकारणात लवकरच सक्रिय होणार आहे, अशी घोषणा केली. 

महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी भुजबळ दोन वर्षे तुरुंगात होते. त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते दोन दिवसांपूर्वी घरी परतले. आज त्यांनी पवार यांची भेट घेतली. पवार व भुजबळ यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी "तब्येतीची काळजी घ्या. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार तातडीने करा', असा वडिलकीचा सल्ला पवार यांनी दिल्याचे भुजबळ म्हणाले. 

भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आनंद व्यक्‍त केला होता. दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर ते परत आल्याने पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त 10 जूनला पुणे येथे कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमात भुजबळ यांची तोफ पुन्हा धडाडणार का, याबाबतची उत्सुकता आहे. 

Web Title: Chhagan Bhujbal meets Sharad Pawar