esakal | मुख्यमंत्री पद हवं असेल तर सोबत या ! राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची शिवसेनेला खुली ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal offer to shivsena for cm post

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री पद हवं असेल तर सोबत या ! राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची शिवसेनेला खुली ऑफर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी युतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा खुलासा करून सेनेच्या इशाऱ्यातून हवा काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

एक प्रकारे छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफरच दिली आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. शिवसेना भाजपसोबत राहूनही मुख्यमंत्रिपद घेऊ शकते, आता ते शिवसेनेने ठरवायचे आहे, असेही भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. 

दरम्यान, अब की बार, 220 पार', अशी गर्जना करत निवडणुकीच्या रणांगणात महाजनादेशासाठी उतरलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीला प्रत्यक्षात मात्र निसटत्या जनादेशावरच समाधान मानावे लागले. विरोधी पक्षाला जेमतेम 25 ते 30 जागा मिळतील, हा सरकारचा दावा जनतेने फेटाळून लावत कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या पदरात जवळपास शंभर जागांचे दान टाकत विजयी शतक साजरे केले असल्याने एकूण आता नेमकी काय समीकरणे उदयाला येतील हे येणारा काळच सांगेल.

loading image
go to top