
जोपर्यंत कायदा अस्तित्वात आहे त्याचा वापर होणार, भुजबळांचा राणा दाम्पत्यावर रोख
भुजबळ म्हणाले, तीन पक्षाचं सरकार असल्यानं थोड घर्षण होणारच
भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकाकी पाडण्यात आलं आहे. राष्ट्रवादीने भाजपसोबत आघाडी केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले आहेत. यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यासाठी ट्वीट केलं आहे. येथील निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडल्यानं यावर कॉंग्रसेचे नाना पटोले यांनी खरमरती शब्दांत टीका केली आहे. 'मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसलाय', असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. आता यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात भुजबळ म्हणाले, तीन पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे थोड तरी घर्षण होणार आहे. एक पक्षाच सरकार असलं तरी होतं. इथ आम्ही तीनजण आहोत. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेसंदर्भात ते म्हणाले, हा राज्य सरकारला धक्का मानत नाही. मध्य प्रदेशला ही हाच निर्णय देण्यात आला आहे. जर इंपेरिकल डेटा मिळाला असता तर हे संकट आलं नसतं. यामागे भाजपचा काय उद्देश आहे हे माहित नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, १६१ जागांसाठी भरती
राजद्रोहाच्या कलमाला तूर्तास स्थगिती देण्यात यावी, या न्यायालयाच्या निकालावर ते म्हणाले, या कायद्याच्या दुरुपयोग होतोय हे याआधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितले होते. हा जुना कायदा असल्याने त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यावर विचार झाला पाहिजे. जोपर्यंत कायदा अस्तित्वात आहे त्याचा वापर होणार असा अप्रत्यक्ष टोकला त्यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी काय पत्र लिहीलं हे मला माहित नाही. पण मुख्यमंत्री यावर १४ तारखेच्या सभेतून उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावर दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, त्यांना काय करायचं आहे ते करु द्या, मुंबईत इतरही कार्यालय आहेत.
हेही वाचा: इंदुरीकर महाराज पुन्हा गोत्यात? वादग्रस्त वक्तव्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता
Web Title: Chhagan Bhujbal Reaction On Nana Patole Statement Of Ncp Bjp Zp Election Bhandara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..