bhujbal raut
bhujbal rautesakal

"मी शिवसेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदार देखील नव्हते"

नाशिक : शिवसेनेत (shivsena) मी असतो, तर मुख्यमंत्री झालो असतो, असं म्हणालो हे मान्य. मात्र, कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत (sanjay raut) यांनाही काम केल्यानेच सामनाचे संपादक केले. मी जेव्हा शिवसेना मोठी केली, तेव्हा ते खासदार देखील नव्हते. अशी बोचरी टीका राज्य मंत्री व पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सोमवारी (ता.२५) झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

राऊतांच्या भाषणाला भुजबळांचे चोख प्रत्युत्तर

नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखा घोषित करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राजकारणाचा विषय निघताच छगन भुजबळ यांनी राऊतांच्या कालच्या भाषणाला चोख प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी काल नांदगावचा नाद करायचा नाही, असे वक्तव्य केले होते. यावर भुजबळ म्हणाले, नांदगावबद्दल राऊत काय बोलले हे माहिती नाही. कुठल्या आवाजात ते बोलतात, त्यावरून अर्थ बदलतात. पाहुणचार देवाणघेवाण होत असते.

संजय राऊत हे शरद पवारांसारखेच महाविकास आघाडीचे शिल्पकार

संजय राऊत हे शरद पवारांसारखेच ‘मविआ’चे शिल्पकार. सुंदर शिल्प तयार झाले असेल, तर त्यावर ओरखडा उमटणार नाही याची काळजी खास करून शिल्पकाराने घ्यावी. शिवसेनेत मी त्यावेळी राज्यात शाखा सुरू केल्या. त्यावेळी संजय राऊत नव्हते. सामनाच्या लॉचिंग वेळेचेही फोटो माझ्याकडे आहेत, असे म्हणताच चांगलीच खसकस पिकली.

bhujbal raut
Drugs Case : आर्यन खान ते समीर वानखेडे व्हाया नवाब मलिक; आतापर्यंत काय घडलं?

याबाबत मला पवार साहेबांशी बोलावे लागेल

शिवसेनेत मी असतो, तर मुख्यमंत्री झालो असतो, असं म्हणालो हे मान्य. मात्र, कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत यांनाही काम केल्यानेच सामनाचे संपादक केले. मी जेव्हा शिवसेना मोठी केली, तेव्हा ते खासदार देखील नव्हते. नांदगाव मतदार संघ विसरा असं ते म्हणाले. या बाबत मला पवार साहेबांशी बोलावे लागेल. नांदगावमध्ये मी जे काम केलं, ते त्यांना माहीत नसावं. कारण त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी या मतदार संघात परत परत यावे. आमचे नेते जयंत पाटील देखील तेथे येऊन गेले. त्यांनीही १०० प्लस आमदार निवडून आणण्याचं आवाहन केलंय, अशी आठवणही भुजबळांनी करून दिली.

bhujbal raut
अज्ञात NCB अधिकाऱ्याच्या 'त्या' पत्रात काय म्हटलंय? वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com