...तर आज मुख्यमंत्री नक्कीच असतो, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal

...तर आज मुख्यमंत्री नक्कीच असतो, भुजबळांचा गौप्यस्फोट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री ( Guardian minister) तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री (Food and Civil Supplies Minister) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा वाढदिवस आहे. 75 व्या वर्षात पदार्पण केलं असून छगन भुजबळांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काय म्हणाले भुजबळ?

भुजबळांनी मनातली खंतही व्यक्त केली

ज्यांच्या सभेत आपण भाषणं दिली, ते आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले आहेत. माझे अनेक सहकारी पुढे गेले. मी मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही. त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यात अर्थ नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसंच मी शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. महाराष्ट्र टाइम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: Dasara 2021 : ठाकरे सरकारकडून पोलीस हवालदारांना गुड न्यूज

शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण

शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. पण ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली, असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे. शिवसेना सोडण्याचे तोटेही मला सहन करावे लागले. शिवसेना सोडली नसती, तर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मीच राहिलो असतो. मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हे सांगितले होते, असंही भुजबळांनी सांगितलं.

हेही वाचा: सेना भवनाबाहेर मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वावरून डिवचण्याचा प्रयत्न?

शरद पवारांशी राहणार एकनिष्ठ

काँग्रेस नेतृत्त्वानं एकेकाळी संपर्क करुन आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे. मात्र ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता,असंही त्यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top