esakal | छगन भुजबळांना चिंता आता कांद्याची
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan-Bhujbal

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कांदा निर्यातबंदी तातडीने हटवावी, यासाठी केंद्र सरकारकडे ते स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळांना चिंता आता कांद्याची

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कांदा निर्यातबंदी तातडीने हटवावी, यासाठी केंद्र सरकारकडे ते स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठवलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असताना कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे. याबाबत शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून केंद्र सरकारकडे बाजू मांडली जाणार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

पूर्वजांच्या स्मरणार्थ द्या मदतीचा हात!; कोरोना मदत प्रकल्पासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून आवाहन

केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, 
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री 

Edited By - Prashant Patil