Chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
Sambhaji Maharaj knew multiple languages including Marathi, Sanskrit, Persian, Urdu, Arabic, Braj, and English : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातील एक तेजस्वी तारा म्हणजे छत्रपती संभाजीराजे. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे पहिले युवराज असलेल्या संभाजीराजांचा जन्म १ मे १६५९ रोजी झाला. ते १६७० पर्यंत भोसले घराण्यातील एकमेव पुत्र होते. शिवरायांनी लहानपणापासूनच त्यांना विद्या, कला, युद्धनीती, प्रशासन आणि राजनीतीचे सर्वांगीण शिक्षण देऊन राज्यकारभारासाठी सक्षम बनवलं. संभाजीराजांचे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे शौर्य, बुद्धिमत्ता आणि प्रजाहितदक्षता यामुळे ते मराठ्यांच्या इतिहासात अजरामर ठरले.