धक्कादायक! प्रेम प्रकरण आई-वडिलांना समजल्याने, घाबरलेल्या तरुणाची आत्महत्या Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News

धक्कादायक! प्रेम प्रकरण आई-वडिलांना समजल्याने, घाबरलेल्या तरुणाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर शहरात राजणगाव परिसरातील शिक्षकनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, रितेश सुखदेव गायकवाड 19 वर्षाय मुलाने आत्महत्या केली आहे.

प्रेयसीसोबत असलेले प्रेमप्रकरण आई-वडिलांना समजल्याने तणावात आलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटने बाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रितेश गायकवाड हा एका कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याची एका मुलीससोबत मैत्री झाली मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

हे दोघे एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनी एकत्र फोटो काढले होते. मोबाईल फोटो मधील फोटो त्याच्या आई-वडिलांनी पाहिले. याफोटो बाबत रितेशला जाब विचारला असता तो प्रचंड घाबरला. पालकांनी त्याला समज दिल्याने तो तणावात आला.

याच तणावातून त्यानी काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरातील फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. आई-वडील रात्री घरी आल्यावर त्यांनी रितेशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांना धक्काच बसला.

रितेशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यानी आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. तातडीने रितेशला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकारणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास हवालदार रामचंद्र बिघोत करत आहेत.

टॅग्स :policecrime