Tanaji Sawant :"निर्ढावलेल्या, मग्रूर मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा..." ; संभाजीराजेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा!

Tanaji Sawant
Tanaji Sawant

छत्रपती संभाजी राजे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी आक्रमक ट्विट केले आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रातील भोंगळ व्यवस्थेचा छत्रपती संभाजी राजे यांनी पर्दाफाश केला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य केंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरी देखील परिस्थिती जैसे थे आहे. इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशा संवेदनाहीन व मग्रूर मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा स्वराज्य यामध्ये उतरेल, असा इशारा देखील संभाजी राजे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

Tanaji Sawant
Uddhav Thackeray : शेंडी-जानव्याचे नाही आम्हाला सावरकरांचे विज्ञानवादी हिंदुत्व मान्य ; ठाकरे गटाच्या नेत्याचे वक्तव्य!

छत्रपती संभाजी राजे यांनी धाराशिवचा दौरा केला त्यावेळी खुद्द आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात आरोग्य सुविधेची वानवा आणि रुग्णालयांची दुरावस्था झाल्याचा आरोप केला होता. संभाजीराजे यांनी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात येणाऱ्या भूम शहरातील शासकीय रुग्णालयाला भेट दिली होती. 

यावेळी त्यांनी रुग्णालयाची दुरावस्था पाहून आरोग्य विभागाचे वाभाडे काढले होते. ग्णालयात डॉक्टर आणि नर्सची कमतरता, रुग्णालय अस्वच्छ असून अनेक वैद्यकीय उपकरणे बंद पडल्याचे पाहून संभाजी राजे संतापले होती. याप्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप व्यवस्था जैसे-थे आहे. 

Tanaji Sawant
Rahul Gandhi Savarkar Row: शरद पवारांनी राहुल गांधींचे टोचले कानं, म्हणाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com