तर वेगळा विचार करावा लागेल; मनमानीला कंटाळलेल्या संभाजीराजेंचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 December 2019

रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाल्याचा आरोप खुद्द रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. खा. संभाजीराजे छत्रपती रायगडावर आहेत. रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्यांनी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

रायगड : रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाल्याचा आरोप खुद्द रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. खा. संभाजीराजे छत्रपती रायगडावर आहेत. रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्यांनी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संभाजीराजे म्हणाले, प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणारी कामे पुरातत्व विभागाकडून रोखली जात आहेत. महाड ते पाचाड मार्गाच्या कामात टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केली. यांसदर्भात संबधित विभागांशी पुराव्यासह पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे वेळीच सुधारले नाहीतर आपल्याला वेगळा विचार करावा लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

रामदास आठवलेंना सरंसंघचालकांचे म्हणणे अमान्य 

किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाने करायचे, तर इतर काम प्राधिकरणाच्या विशेष विभागाने करायचे असे दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयातील बैठकीत ठरले होते. त्यानुसार, काही कामे प्राधिकरणाने सुरु केली होती. मात्र पुरातत्व विभागाने ती थांबवली. हे चुकीचे आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. खा. संभाजीराजे छत्रपती या भ्रष्टाचाराला आणि मनमानीला कंटाळले असून ते रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhatrapati sambhajiraje is said be out raigad authority committee