शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ व्हायरल होताच, दानवेंनी मागितली माफी; Raosaheb Danve | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raosaheb Danve

Raosaheb Danve: शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ व्हायरल होताच, दानवेंनी मागितली माफी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलच तापलेलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. आता भाजपचे नेते केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होताच दानवे यांनी माफी मागितली आहे. (chhatrapati shivaji maharaj Raosaheb Danve Apology controversy statement maharashtra politics)

शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ व्हायरल होताच दानवे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

काय म्हणाले दानवे?

सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.

हेही वाचा: राज्यात पुन्हा सोन्याच्या खाणी सापडल्या; जीएसआयच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

काही माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असे वृत्त दिले आहे. मात्र या दोन वर्षांमध्ये मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन वर्षांपूर्वी मी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती.

त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

हेही वाचा: Maharashtra Cabinet Expansion : आमदारांची कोंडी, राज्यपालांची गच्छंती; विस्तार रखडण्याची तीन कारणं

तसेच, सध्या हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखे दाखवण्यात येत आहे. माझ्या त्या विधानाची मी तेव्हाच माफी मागितली होती. आताही पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो. आज मी शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी ते वक्तव्य आज केल्याचे दाखवले जात असून ते चुकीचे आहे. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.