राज्यात पुन्हा सोन्याच्या खाणी सापडल्या; जीएसआयच्या सर्वेक्षणातून माहिती समोर; Gold mines | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold mines were again Maharashtra state Information from GSI survey

राज्यात पुन्हा सोन्याच्या खाणी सापडल्या; जीएसआयच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

मागील आठवड्यात राज्यातील दोन जिल्ह्यात सोन्याचा खाणी सापडल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातही मुबलक प्रमाणात साेन्याचे साठे असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम ब्लाॅकमध्ये परसाेडीच्या परिसरात साेन्याचे मुबलक साठे असल्याचे जीएसआयने नमूद केले आहे.(Gold mines were again Maharashtra state Information from GSI survey)

जीएसआयने प्रकाशीत केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात परसोडीसह किटाळी, मरुपार आणि भंडारा जिल्ह्यात भीमसेन किल्ला पहार येथे सोन्याचा खजिना असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: सोन्याचा दिवस! महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यात सापडल्या चक्क सोन्याच्या खाणी

जीएसआयने परसोडी भागात तपशीलवार सर्वेक्षण करून चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात मौल्यवान धातूचे साठे असल्याची शक्यता वर्तविली आहे. भिवापूर परिसरातही सोन्याचे साठे असण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे जीएसआयने सांगितले आहे.

खोदकाम करण्याचा सल्ला जीएसआयने राज्य सरकारकडे अहवालाद्वारे दिला होता. मात्र, कालपरत्वे या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

यापूर्वी, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) आढळून आल्या आहेत. राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ओझरता उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता.

टॅग्स :Maharashtra News