
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. यानंतर सरकारने नव्याने पुतळा उभा केला आहे. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुतार साहेबांनी उत्तम असा हा पुतळा तयार केलाय. वादळं जरी आली तरी त्याच्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करून हा पुतळा उभारला आहे. किमान १०० वर्षे कोणत्याही वातावरणात हा पुतळा टिकेल.