Chiken Thali : चिकन थाळी स्वस्त, व्हेज थाळी महाग! 'क्रिसिल'चा जानेवारी महिन्याचा सर्व्हे काय म्हणतो?

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. मागच्या वर्षभरात भाज्यांचे दर वाढल्याने घरगुती शाकाहारी थाळी महागली आहे. तर ब्रॉयलर कोंबडीच्या दरात घट झाल्याने चिकन थाळी स्वस्त झाली आहे. क्रिसिल या संस्थेने जानेवारी महिन्यात केलेल्या मासिक सर्व्हेत डिसेंबर महिन्यापेक्षा जानेवारी महिन्यात चिकन थाळी स्वस्त झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
Chiken Thali : चिकन थाळी स्वस्त, व्हेज थाळी महाग! 'क्रिसिल'चा जानेवारी महिन्याचा सर्व्हे काय म्हणतो?

मुंबईः तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. मागच्या वर्षभरात भाज्यांचे दर वाढल्याने घरगुती शाकाहारी थाळी महागली आहे. तर ब्रॉयलर कोंबडीच्या दरात घट झाल्याने चिकन थाळी स्वस्त झाली आहे. क्रिसिल या संस्थेने जानेवारी महिन्यात केलेल्या मासिक सर्व्हेत डिसेंबर महिन्यापेक्षा जानेवारी महिन्यात चिकन थाळी स्वस्त झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आपल्या ताटात जे अन्न वाढलं जातं, त्याचा नेमका खर्च किती याची माहिती सर्व्हेद्वारे देणारी संस्था क्रिसिल आहे. संस्थेच्या जानेवारी महिन्याच्या सर्व्हेनुसार नॉनव्हेज थाळीपेक्षा व्हेज थाळी महाग झालीय. रोटी, राईस आणि पोल्ट्रीच्या किंमती कमी झाल्यामुळे नॉन व्हेज थाळीची किंमत मागच्या वर्षात १३ टक्क्यांनी कमी झाली.

Chiken Thali : चिकन थाळी स्वस्त, व्हेज थाळी महाग! 'क्रिसिल'चा जानेवारी महिन्याचा सर्व्हे काय म्हणतो?
Shatrughan Sinha : 'कित्येक मोठे हिरो माझ्यावर जळायचे म्हणून तर मला कधीही...', शत्रुघ्न सिन्हा काय बोलून गेले?

तर मागच्या वर्षभरात व्हेज थाळी ५ टक्क्यांनी महाग झाली. डाळी, तांदूळ, कांदा आणि टोमॅटोच्या किंमती वाढल्याने व्हेज थाळी ५ टक्के महागली. यात बारकाईने बघायचं म्हटलं तर मागच्या वर्षात कांद्याचे दर ३५ टक्क्यांनी वाढले आहेत आणि टोमॅटोचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. डाळी आणि तांदळाच्या किंमती अनुक्रमे १४ आणि २१ टक्के वाढल्या आहेत. त्याचा परिणाम शाकाहारी थाळीवर झाला.

Chiken Thali : चिकन थाळी स्वस्त, व्हेज थाळी महाग! 'क्रिसिल'चा जानेवारी महिन्याचा सर्व्हे काय म्हणतो?
Onion Export Ban Lift : कांदा निर्यातबंदी मागे पण याचा फायदा बड्या व्यापाऱ्यांनाच? विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

नॉन व्हेज थाळी स्वस्त होण्यामागे मुख्य कारण ब्रॉयलर चिकन आहे. वर्षभरात ब्रॉयलर चिकनच्या किंमती २६ टक्क्यांनी घटल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात ८ ते १० टक्क्यांनी ब्रॉयलर पोल्ट्रीच्या किंमती घसरल्या आहेत. एकूणच काय तर शाकाहारी थाळीची किंमत डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात ६ टक्क्यांनी कमी झाली. तर मांसाहारी थाळीची किंमत ८ टक्क्यांनी कमी झाली. मांसाहारींसाठी ही सुखद धक्का देणारी आकडेवारी ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com