मुख्यमंत्री जेव्हा पाकीट विसरतात...

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

मुंबई - येथील शेतकरी आठवडी बाजारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही भाज्यांची आणि फळांची खरेदी केली; पण पाकीट विसरल्याने त्यांना उसनवारी करावी लागली; पण उपस्थितांपैकी कोणी तरी "बाजारात दिलेले पैसे उसने असतात, ते परत द्यावे लागतात‘, अशी कोटी करताच हास्याची लकेर उमटली. 

विधान भवनाच्या प्रांगणात मुंबईतील पहिल्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजारचे उद्‌घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार पणन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अरविंद सावंत, खासदार राजू शेट्टी आदी उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर या बाजारातील स्टॉल्सला भेट देत शेतकरी तसेच आदिवासी भगिनींशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलकडे वळले. तेथील कुरडू, भारंगी, टाकळी भाज्यांची आणि काही फळांचीही खरेदी केली. खरेदी केलेल्या भाजी आणि फळांचे पैसे देण्यासाठी जेव्हा त्यांनी खिशात हात घातला, तेव्हा पाकीटच घरी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी तातडीने त्यांना काही पैसे दिले. त्यावर उपस्थितांनी बाजारात दिलेले पैसे उसने असतात, ते परत द्यावे लागतात, अशी कोटी केली. 

या वेळी ते म्हणाले,"" संत सावता माळी यांनी भाजीपाल्याच्या माध्यमातून ईश्वराशी संवाद साधला. या बाजारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य भाव, आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.‘‘ 

Web Title: Chief forget when the wallet ...