
Narendra Modi Maharashtra Tour
ESakal
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन देण्यात आले आहे. आम्ही त्यांना महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीची माहिती त्यांना दिली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे किती नुकसान झाले आहे, हे त्यांना आम्ही सांगितले आहे. आम्ही त्यांना एनडीआरएफच्या माध्यमातून मदत करण्याची विनंती केली आहे. आमच्या विनंतीला त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.