मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला; CM शिंदेंकडून भूपिंदर सिंह यांना श्रद्धांजली | Bhupinder Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Eknath Shinde pays tribute to veteran singer Bhupinder Singh

मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला; CM शिंदेंकडून भूपिंदर सिंह यांना श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंग यांचे आज मुंबईत निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त 'आपल्या भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. (Chief Minister Eknath Shinde pays tribute to veteran singer Bhupinder Singh)

'मनाचा ठाव घेणाऱ्या आपल्या आवाजाने भूपिंदर सिंह यांनी अनेक गझल अजरामर केल्या. त्यांचा धीरगंभीर आणि भावस्पर्शी आवाज रसिकांच्या मनात कायम स्वरुपी रुंजी घालत राहील. ज्येष्ठ गायक, गझलकार भुपिंदर सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

हेही वाचा: प्रख्यात गायक भूपिंदर सिंग यांचे निधन

भूपिंदर सिंग यांच्या पत्नी आणि गायिका मिताली सिंग यांनी ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी गायलेल्या बॉलिवूडमधील अनेक गाण्यांसाठी ओळखले जाणारे भूपिंदर सिंग यांनी सोमवारी संध्याकाळी 7:45 वाजता मुंबईतील अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी मिताली यांनी ते काही दिवसांपासून आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त होते. यामध्ये यूरिनरी समस्यांचाही समावेश होता. 82 वर्षीय गायक भूपिंदर सिंग यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा: Monkeypox : देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळल्याने केंद्र सरकार अलर्टवर!

Web Title: Chief Minister Eknath Shinde Pays Tribute To Veteran Singer Bhupinder Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Eknath Shinde
go to top