दुष्काळासाठी मुख्यमंत्री निधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुंबई - राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे मागितलेला निधी अडकल्याने मुख्यमंत्री निधीला हात घालण्याची नामुष्की सरकारवर ओढवली.

राज्यात २०१५ मध्ये घोषित केलेल्या दुष्काळानंतर ४५ महिन्यांत दुष्काळ निवारण्यासाठी जमा झालेल्या ८७ कोटींपैकी ५० कोटी रुपये वितरित केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निधीत सध्या ३७ कोटी रुपये शिल्लक आहेत. राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे.

त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आठ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. यासाठी केंद्राच्या पथकाने पाहणी केली असून, या निधीची राज्याला प्रतीक्षा आहे. मात्र, अद्याप हा निधी मिळालेला नाही. त्यामुळे अधिवेशनात तरतूद केलेल्या निधीसह मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे दुष्काळी उपाययोजनांसाठी वापरण्याची वेळ सरकारवर आली, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

Web Title: Chief Minister Fund for Drought