मुख्यमंत्र्यांनी घेतला मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी घेतला मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा

मुंबई : पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे; तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मॉन्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाची माहिती दिली. भारतीय हवामान खात्याचे के. एस. होसळीकर यांनी राज्यातील मोसमी पावसाच्या अंदाजाची माहिती दिली. राज्यात 17 जूनपर्यंत सर्वत्र पावसाची उपस्थिती जाणवणार आहे; तसेच राज्यात यंदा सरासरी 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 18 व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) 3 पथके सदैव तैनात असणार आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com