राज्यात तणाव! PM मोदींच्या कार्यक्रमाला CM ठाकरे मारणार दांडी | Uddhav Thackeray And Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray And Narendra Modi

राज्यात तणाव! PM मोदींच्या कार्यक्रमाला CM ठाकरे मारणार दांडी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता कमी आहे. याबाबतचे वृत्त साम वृत्तवाहिनीने दिलेले आहे. आज रविवारी (ता.२४) लता मंगेशकर पुरस्कार वितरण समारंभ संध्याकाळी होत आहे. हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर झाला आहे. तो स्वीकारण्यासाठी मोदी आज मुंबईत येत आहेत. या समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची सांगण्यात येत आहे. राज्यातील भाजप- शिवसेनेतील वाढता वाद पाहता मुख्यमंत्री यांनी कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. (Chief Minister Uddhav Thackeray Could Not Attend PM Modi Program)

हेही वाचा: नरेंद्र मोदी पोहोचण्याआधीच जम्मूत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, छावणीचं स्वरुप

पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जाहीर झाला आहे. आज पुरस्कार वितरण समारंभ मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यासाठी मोदी मुंबईत येत आहेत. दुसरीकडे पुरस्कार वितरण समारंभाच्या पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव नसल्याचे कळते. त्यामुळे ठाकरे समारंभाला उपस्थित राहणार नाहीत.

हेही वाचा: उद्धव ठाकरे हे मुंबईतील दाऊद इब्राहिम, गॅंगवॉरला सुरुवात - नितेश राणे

मंगेशकर कुटुंबीयांमार्फत प्रत्येक वर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना कृतज्ञतापूर्वक पुरस्कार दिला जातो. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जाणार आहे. मोदी यांनी ही आपण हा पहिलाच आणि शेवटचा पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगितले होते.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray Could Not Attend Pm Modi Program

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top