मुख्यमंत्री आजारी आहेत, फडणवीसांना मुख्यमंत्री करावं: आठवले

 Ramdas Athawale
Ramdas Athawalesakal media

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या फारसे सक्रिय दिसत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिले होते. सध्या सुरु असणारं हिवाळी अधिवेशन देखील कोरोना आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचं कारण पुढे करत मुंबईतच घेण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री अधिवेशनात अनुपस्थित राहिल्याने पहिला दिवस चांगलाच गोंधळाचा ठरला. त्यांनी आपला कार्यभार इतर कुणाकडे तरी सोपवावा, असा सल्ला देखील विरोधकांनी सरकारला दिला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महत्त्वाचं विधान केलंय.

 Ramdas Athawale
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

एकीकडे मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांची नावे सुचवली जात असतानाच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री करण्याचा पर्याय सुचवला आहे.

 Ramdas Athawale
Omicron Updates : देशात सर्वाधित रूग्ण दिल्लीत; महाराष्ट्राचा नंबर दुसरा

मुख्यमंत्री आजारी असल्याने राज्यात अनागोंदी कारभार चालला आहे का? अशावेळी मुख्यमंत्रीपद इतर कुणाकडे सोपवलं जाऊ शकतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी रामदास आठवले म्हणाले की, मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी २- ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com