राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा | CM uddhav thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची (cabinet meeting) महत्वपूर्ण बैठक आज दुपारी साडे तीन वाजता मंत्रालयात होत आहे. दरम्यान या बैठकीत महत्वांच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

कोरोनाबाबत उपाययोजना

राज्यात कोरोनाच्या (corona third wave) तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत देखील महत्वाची चर्चा होणार आहे. एवढेच नाही तर लॉकडाऊनच्या (lockdown) काळात वार्षिक कर भरणाऱ्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाहन करातून १००% सूट देण्याबाबतचा निर्णय देखील आजच्या बैठकीत होणार आहे.

राज्यावर ओढावलेले ओमिक्रॉनच्या विषाणूच्या संकटावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली असून, हे संकट रोखायचे कसे आणि आणखी कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील, यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: राज्यातील परिस्थिती धक्कादायक, एकमेकांवर विश्वास नाही - SC

मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचा महत्वपूर्ण प्रस्ताव

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचा महत्वपूर्ण प्रस्ताव आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ बांधकाम क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी, दिपक पारेख समितीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकासाठी तसेच इतर बाबींसाठी आकारण्यात येणारे अधिमूल्य कमी करण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.

हेही वाचा: लस घेणाऱ्यांना Omicron चा प्रादुर्भाव कमी - मुंबई महापौर

Web Title: Chief Minister Will Take State Cabinet Meeting Today Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top