
लस घेणाऱ्यांना Omicron चा प्रादुर्भाव कमी - मुंबई महापौर
मुंबई : कोरोनाच्या (corona) ओमिक्रॉन (omicron) या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून काळजी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर (mayor kishori pednekar) यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे. दरम्यान लस घेणाऱ्यांना प्रादुर्भाव कमी होत असून लस न घेणाऱ्यांना अधिक त्रास होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मुंबईचा बाधितांचा आकडा ३०% वरून २०% पर्यंत खाली
ओमिक्रॉनचा धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर आता बारकाईने नजर ठेवली जात असून पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना लागण होऊ नये, याचीही काळजी घेतली जात आहे. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना माहिती दिली आहे.
महापौर पेडणेकरांनी नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केले आहे. लस घेणाऱ्यांना प्रादुर्भाव कमी होत असून लस न घेणार्यांना अधिक त्रास होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या २ दिवसात मुंबईचा बधितांचा आकडा ३०% वरून २०% पर्यंत खाली आला आहे. गेल्या ४ दिवसांत दैनंदिन बाधित संख्या २०७०० वरून ११६४७ पर्यंत खाली आली आहेत
हेही वाचा: राज्यात काल दिवसभरात 34 हजार रुग्ण
रुग्णालयातील ८०% खाटा रिक्त आहेत
काळ १ दिवसात ८५१ इतक्या रूग्णालयामध्ये असलेल्या रुग्णशय्या भरल्या गेल्या मात्र त्याच वेळी काल ९६६ रुग्णशय्या रिकाम्या झाल्या. २१ डिसेंबर २०२१ रोजी तिसरी लाट सुरू झाल्यापासून , या तिसऱ्या कोविड लाटेमुळे २२ दिवसांत ४६ मृत्यू झालेत , यात दररोज सरासरी २ मृत्यू होतायत
घाबरू नका, पण अत्यंत सावधगिरी बाळगा असं आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना केलं आहे तसेच मास्कचा वापर करा आणि कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे
हेही वाचा: उत्तर प्रदेशचा २२वा उत्तराधिकारी कोण?
Web Title: Mumbai Mayor Kishori Pednekar Requested Citizens For Vaccination Fight Omicron Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..