मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला ब्रेक; तर डॉ. कोल्हेंची यात्रा सुपरफास्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला ब्रेक
- डॉ. अमोल कोल्हेंची शिवस्वराज्य यात्रा सुपरफास्ट

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा तर शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा राज्यात सध्या सुपरफास्ट सुरू असल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज अकोला, बाळापूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर आणि जामनेर येथे पोहोचणार होती. परंतु पूरपरिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबईत त्यांनी राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला. राज्यात पुरस्थिती असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. याचवेळी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

दुसरीकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा नियोजित वेळेनुसार सुरू आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या आजच्या अहमदनगर आणि शेवगाव येथे दोन्ही सभा पार पडल्या असून तिसरी सभा गंगापूर येथे 05 वाजता होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Ministers Mahajanesh get break and Amol Kolhes Shivsvarajya Yatra is Superfast