
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना मिळणार मुदतवाढ
मुंबई: राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने (State govt) घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्य सरकारने मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना ३ महिन्यांची मुदत वाढ दिल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. सीताराम कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि ठाकरे सरकार बरोबर निर्माण झालेले चांगले संबंध यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे.
या निर्णयामुळे सीताराम कुंटे फेब्रुवारीपर्यंत राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम करु शकणार आहेत. सीताराम कुंटे मुळचे सांगलीचे आहेत. सहकारी प्रवीणसिंह परदेशी यांना मागे टाकत त्यांना मुख्य सचिव म्हणून संधी मिळाली. सीताराम कुंटे मूळचे सांगलीकर. त्यांच्या आजोबांचा कुंटेवाडा सांगलीतील कापड पेठेत होता. सध्या तिथे महेश नागरी पतसंस्थेची इमारत आहे. कुंटे यांचे बालपण पाटणा (बिहार) शहरात गेले. उच्चशिक्षणासाठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यांचे वडील बिहार केडरचे आयएएस होते.
हेही वाचा: नातेवाईकाकडूनच घात, विवाहितेवर वारंवार बलात्कार
नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून परिचित असणारे त्यांचे वडील बिहारचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त झाले. पुढे निवृत्तीनंतर कुंटे यांनी अहमदाबादच्या "आयआयएम'मध्ये अतिथी व्याख्याते म्हणून काम केले. त्यांचे वडील निवृत्तीनंतर काही काळ सांगलीत स्थायिक झाले.
हेही वाचा: भाजपामध्येही अंतर्गत वाद? शेलार पाच मिनिटात व्यासपीठावरुन निघाले
बीए अर्थशास्त्र, एमए अर्थशास्त्र पदवीनंतर 1985 मध्ये कुंटे आयएएस झाले. राज्य शासनात विविध पदांवर काम करताना त्यांना मसुरीच्या आयएएस ट्रेनिंग ऍकॅडमीतर्फे 2013 मध्ये "न्यू यॉर्क'ला विशेष प्रशिक्षणाची संधी मिळाली होती. देशातील मोजक्या आयएएस अधिकाऱ्यांना अशी संधी मिळते. मुंबई महापालिका आयुक्त तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळलेले कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात.