भाजपामध्येही अंतर्गत वाद? आशिष शेलार पाच मिनिटात व्यासपीठावरुन निघाले | Bjp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ashish Shelar

भाजपामध्येही अंतर्गत वाद? शेलार पाच मिनिटात व्यासपीठावरुन निघाले

मुंबई: सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु आहेत. वांद्रयातील काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी (Zishan siddiqui) यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai jagtap) यांची थेट सोनिया गांधींकडे (Sonia gandhi) तक्रार केली आहे. पक्षात अपेक्षित मान-सन्मान मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. आता काँग्रेस प्रमाणेच भाजपामधीलही (Congress-bjp) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. मागच्या काही महिन्यांपासून त्यांची जोरदार तयारी सुरु आहे. काहीही करुन यावेळी पालिकेवर सत्ता मिळवायचा चंग दोन्ही पक्षांनी बांधला आहे. पण त्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेदांची दरी दिसत आहे.

हेही वाचा: मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर

भाजपामधीलही अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. आज वांद्रे येथील मुंबई भाजपच्या आंदोलनाच्यावेळी हे प्रकर्षाने दिसून आलं. भाजप आमदार आशिष शेलार यांची नाराजी दिसून आली. त्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतल्याची माहिती आहे.

हेही वाचा: नातेवाईकाकडूनच घात, विवाहितेवर वारंवार बलात्कार

व्यासपीठावर केवळ पाच मिनिटे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित न करताच ते निघून गेले. प्रसार माध्यमांशीही बोलणे टाळले. नांदेड, अमरावती, मालेगाव दंगलीच्या निषेधार्थ वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. मागच्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे होती. आता अतुल भातखळकर यांच्याकडे ही जबाबदारी आहे. त्यामुळे शेलार नाराज असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Bjp