उजनीत सापडला पावणेतीन किलोंचा चिलापी मासा

उजनीत सापडला पावणेतीन किलोंचा चिलापी मासा

केतूर(सोलापूर) : गौळवाडी (ता. करमाळा) येथील मच्छीमार बापूराव भोई यांना उजनी जलाशयात मच्छिमारी करीत असताना आपल्या जाळयात चिलापी जातीचा मोठा मासा सापडला. त्याचे वजन तब्बल पावणेतीन किलो भरले. हा मासा त्यांनी भिगवण मच्छिमार्केटमध्ये विकला.

उजनी जलाशयाच्या अथांग गोडया पाणीसाठ्यात रहू, कटला, वाम, मरळ, काणस, मिरगण जातीचे मासे मोठ्या प्रमाणात सापडत होते. उजनी जलाशयाच्या प्रदूषणात वरचेवर वाढच होत चालल्याने अनेक जातीच्या माशांचे अस्तित्व धोक्यात आले व हे मासे मिळणे अवघड झाले. सध्या जलाशयात "फक्त आणि फक्त" चिलापी जातीचाच मासा मोठ्या प्रमाणावर सापडतो. त्यातही या चिलापी जातीचा मासा किती ? वजनाचा असावा तो म्हणजे पाव किलोपासून ते दीडपर्यंत. परंतु भिगवण (ता. इंदापूर) येथील मच्छिमार्केटमध्ये तब्बल पावणेतीन किलो वजनाचा चिलापी जातीचा मासा विक्रीसाठी आला होता. या माशाला दरही उच्चांकी म्हणजे तब्बल १६५ रूपये प्रति किलो असा मिळाला. म्हणजे एका चिलापी माशाचेच तब्बल ४५४ रुपये झाले. तो उरूळी कांचन, पुणे येथील मासे व्यापाऱ्याने खरेदी केला.

उजनी जलाशयाचा पाणीसाठयात वरचेवर घट होत असल्याने मच्छीमारांना मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या माशांना मागणी वाढली असताना जलाशयात मासेच सापडत नसल्याने माशाचे दर मात्र तेजीत आहेत़़.

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपूर्वी जलाशयाच्या पाण्यात दौंड परिसरात तब्बल 44 किलो वजनाचा कटला जातीचा मासा मच्छिमारांना सापडला होता.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com