बारामतीत आजपासून "चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - बालवयातच शास्त्रज्ञ असल्याची चुणून दाखविणाऱ्या भावी शास्त्रज्ञांचा "नॅशनल चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस' हा मेळा मंगळवार (ता. 27) पासून बारामती येथे भरणार आहे. देशभरातील साडेसहाशे बालशास्त्रज्ञ यात सहभागी होणार आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या मेळ्याचे उद्‌घाटन होईल. 

केंद्र सरकारचा विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी आणि बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी यांनी पाच दिवस चालणाऱ्या या बालवैज्ञानिक मेळ्याचे आयोजन केले आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांचा विकास करणे, ही या मेळ्याची मूळ संकल्पना आहे, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. या वेळी विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ए. व्ही. प्रभुणे, प्रा. हेमचंद्र प्रधान, शास्त्रज्ञ मिलिंद कुलकर्णी, "सी-डॅक'चे डॉ. हेमंत दरबारी, संजय वाढेकर, अपूर्वा बर्वे उपस्थित होते. 

दुबई, आबुधाबी, कंबोडिया, इंडोनेशिया आदी देशांतील विद्यार्थीही यात सहभागी होणार आहेत. नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन, आरोग्य, स्वच्छता, ऊर्जा, अन्न, कृषी व्यवस्थापन आदी विषयांवर विद्यार्थी त्यांचे प्रयोग सादर करतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, सातवीच्या पुढील विद्यार्थ्यांना घेऊन हे प्रदर्शन पाहण्याची आणि शास्त्रज्ञांशी हितगुज करण्याची संधी मिळणार आहे. 

Web Title: Children's Science Congress in baramati