रुग्णसंख्येत महाराष्ट्राने चीन, कॅनडालाही सोडलं मागे, जाणून घ्या महत्त्वाची आकडेवारी...

रुग्णसंख्येत महाराष्ट्राने चीन, कॅनडालाही सोडलं मागे, जाणून घ्या महत्त्वाची आकडेवारी...

Published on

मुंबई - गेल्या 24 तासात देशात 11,458 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी  सापडलेल्या कोरोना रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यासोबतच देशात एकुण कोरोना बाधितांची संख्या 3 लाखावर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 8,884 लोकांचा मृत्यु झाला आहे. 

दहा दिवसात 1 लाख बाधित
गेल्या दोन आठवड्यापासून दिवसात देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. देशामध्ये गेल्या 10 दिवसात एक लाख नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसाला 9 ते 10 हजाराच्या घरात नवे रुग्ण सापडत आहेत. नवे कोरोना बाधित सापडण्याच्या प्रमामात भारत आता जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

मोठी बातमी "दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधीकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक..."

महाराष्ट्राने कॅनडा, चीन, बांगलादेशला मागे सोडले 
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या मुंबई शहरात 55,357 रुग्ण आहेत. राज्यात गेल्या दोन दिवसापासून 3 हजाराच्या वर नवे रुग्ण सापडले आहेत. राज्याची एकुण रुग्णसंख्या बघता, महाराष्ट्राने कॅनडा,चीन आणि बांगलादेश या देशांना मागे टाकले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली, तामिळनाडू , गुजरात या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. 

महाराष्ट्र

  • एकुण रुग्णसंख्या -1,1,141 
  • मृत्यु-3,717 

कॅनडा

  • एकुण रुग्णसंख्या- 97,943
  • मृत्यु- 8,049

चीन

  • एकुण रुग्णसंख्या- 89,702
  • मृत्यु- 4,634

बांगलादेश 

  • एकुण रुग्णसंख्या- 81,523
  • मृत्यु- 1,095

china and Canada are now behind maharashtras covid positive patient count check statistics

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com