esakal | Chipi Airport: आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्री - नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

aditya and uddhav thackeray

Chipi Airport: आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्री - नारायण राणे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं (Chipi airport) उद्घाटन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) एकत्र आले होते. अपेक्षेप्रमाणे नारायण राणेंनी जाहीर कार्यक्रमात कोकणच्या विकासाच्या मुद्यावरुन शिवसेनेला सुनावलं.

"सिंधुदुर्गात इन्फ्रास्ट्रक्चर बनलय त्याला कारण नारायण राणे आहे. दुसऱ्याचं नाव जवळपासही येऊ शकत नाही. इथल्या शाळा, वर्ग, एकावेळेला ३४० शिक्षक मी आणले. आता शिक्षकांची कमतरता नाही.१५ ऑगस्ट २००९ रोजी मी आणि सुरेश प्रभू विमानतळाचं भूमिपूजन करायला आलो होते. त्यावेळी विमानतळ नको म्हणून आंदोलन सुरु होतं. रेड्डी बंदरही अजून झालं नाही. मी नाव घेतलं तर राजकारण होईल" असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा: मुख्यमंत्री माझ्या कानात काही बोलले, मी एक शब्द ऐकला - नारायण राणे

"सी वर्ल्ड प्रकल्पासाठी अजित पवारांनी १०० कोटी दिले. काय झालं सी वर्ल्ड प्रकल्पाचं? कोणी रद्द केला ते आज स्टेजवर आहेत, असे नारायण राणे म्हणाले. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी टाटा संस्थेने दिलेल्या ४८१ पानांच्या अहवालाचा अभ्यास करावा. आदित्य माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री आहे. उद्धव ठाकरेंना अभिप्रेत काम करुन दाखवा. मला आनंद वाटेल" असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा: कपिल शर्मावर सैफ झाला नाराज; कारण..

"माझ्यावेळेला जेवढी धरणाची कामं झाली. त्यानंतर एक टक्काही काम झालेलं नाही. कसला विकास? एअरपोर्टला पाणी नाही, वीज नाही. विमानतळ झाला लोकांनी काय खड्डे पहावे. विमानतळ उद्घाटनापूर्वी रस्ते, वीज ही व्यवस्था एमआयडीसीने करायला हवी होती" अशा शब्दात नारायण राणेंनी सुनावलं.

loading image
go to top