esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

vaibhav naik,
nitesh rane

Chipit Airport: उद्घाटनाआधी राणेंचे वैभव नाईकांवर कॉन्ट्रॅक्टवरुन आरोप

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "चिपी विमानतळांचं (Chipit Airport) उद्घाटन हा कोकणवासीयांसाठी (kokan) भावनिक क्षण आहे. मला वडिलांचा अभिमान वाटतो. नेत्यामधली इच्छाशक्ती काय असते, हे त्यांनी राज्याला, देशाला दाखवून दिलं" अशी भावना नारायण राणेंचे (narayan rane) सुपूत्र आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी व्यक्त केली. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.

"आज जे पुढे येऊन बोलतायत वैभव नाईक, विनायक राऊत त्यांच्याविरोधात आम्ही पुराव्यासकट सांगू शकतो. सी वर्ल्ड प्रकल्प असो, आज या सगळ्या गोष्टी थांबून राहिल्या आहेत. एअरपोर्टचं काम सुरु असताना विनायक राऊत, वैभव नाईक आंदोलन करत होते. पण विमानतळाच्या ब्लास्टिंगचा कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतला? वैभव नाईकांच्या लोकांनी हे काम मिळवलं. विमातनळ चालू झाल्यानंतर हाऊस किपिंगच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट खासदार विनायक राऊत यांच्या भाच्याच्या कंपनीला मिळालं आहे" असा आरोप नितेश राणेंनी केला.

हेही वाचा: Chipi Airport: 'नारायण मला तुझा अभिमान आहे असेच बाळासाहेब म्हणाले असते'

"तुम्हाला फायदा घ्यायचाच होता, मग विरोध का केला? खरंतर २०१५ सालीच हा विमानतळ सुरु व्हायला पाहिजे होता. पण सात वर्ष उशीर झाला. राणेंनी पुढाकार स्वत:साठी घेतला नाही. तुम्ही भाजपासोबत राज्यात, केंद्रात सत्तेत होता. अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते. मग परवानग्या का नाही मिळाल्या? आम्हाला श्रेय घेण्याचीगरज नाही" असे नितेश राणे म्हणाले.

loading image
go to top