चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात ; 'या' संस्थेतर्फे मेडिकल किट्सचे वाटप

social work in chiplun
social work in chiplunsakal media

चेंबूर: चिपळूण पूरग्रस्तांना (chiplun flood tragedy) मदतीचा हात म्हणून निब्बाण शैक्षणिक व सामाजिक संस्था ( नेस्ट - सेव ) व सर्च संस्थेच्या (social organization) वतीने मेडिकल किट (medical kits) वाटप करण्यात आले. महाड व चिपळूण परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना मदतीची गरज आहे. याकरिता सामाजिक बांधिलकी (humanity) जोपासत निब्बाण शैक्षणीक व सामाजिक संस्था( नेस्ट - सेव ) व सर्च या संस्थेच्या वतीने महाड व चिपळूण मधील पेढे, कोरसे, चिपळूण, पोसरे, पेठमाप, गोवळकोट, कलमस्टे, करमबोली 500 पेक्षा अधिक पूरग्रस्त (flood affected people) घरांना मेडिकल किट, वही, न्युन्ट्रीक वाटप करीत एक मदतीचा हात देण्यात आला.

social work in chiplun
कल्याणच्या अंगणवाडी सेविकांनी केले 200 मोबाईल परत; जाणून घ्या प्रकरण

यावेळी संस्थेचे सचिव विशाल गायकवाड, संचित तांबे, चिपळूण रेल्वे स्थानकांचे व्यवस्थापक नवनीत गमरे, समाजसेवक शशिकांत गमरे, राजेंद्र नगराळे,पोसरे गांवातील अनिल मोहिते तसेच विविध गावातील पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाकरिता सर्च संस्थेचे प्रा.संतोष गांगुर्डे, प्रा.लक्ष्मी साळवी, नेस्ट अध्यक्षा स्वानंदी तांबे, ऍड. हरेश तांबे, समाजसेविका स्वाती तपासे, शिक्षिका सुनीता व्हावल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com