हाच का 'महाविकास आघाडी'चा कॅामन मिनिमम प्रोग्राम? चित्रा वाघ यांचा खोचक सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitra vagh

राज्यसरकार तातडीने निर्णया का घेत नाही, असा सवाल विरोधी नेत्यांकडून विचारला जात आहे.

"हाच का 'महाविकास आघाडी'चा कॅामन मिनिमम प्रोग्राम?"

जवळपास आठवडाभर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान असे असेल तरी राज्यसरकार तातडीने निर्णया का घेत नाही, असा सवाल विरोधी नेत्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान आता भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं आहे.

हेही वाचा: 'हॉंगकॉंगमध्ये झोपा काढायला बसेस अन् महाराष्ट्रात...'

त्या म्हणतात, ऐन दिवाळीत 2 हजार एसटी कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप या सरकारनं केल आहे. नोकरी घालवणं, उपाशी मारणं, बेघर करणं, आत्महत्येस प्रवृत्त करणं हीच या सरकराची भूमिका आहे. हाच का '#MVA'चा कॅामन मिनिमम प्रोग्राम आहे का? असा सवाल ही त्यांनी केला आहे. आता हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे. निलंबन अशा या महाविसकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं आहे. आता या ट्विटमुळे पुन्हा एकदा या एसटी कामगाऱ्यांच्या विषयाला वेगळे वळण लागणार का याकडे लक्ष असणार आहे.

दरम्यान, राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला आहे. यावरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा ड्युटीवर येणाऱ्या कर्माचाऱ्यांना रोखत आहे, असा आरोप केला होता. दरम्यान येत्या चार दिवसात संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन केल्याचे समजते. प्रशिक्षण पूर्ण झालेले २५०० नवे कर्मचारी सेवेत उतरवण्याच्या राज्य सरकार तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. ST कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता संपातील कर्मचाऱ्यांचे पगारही बंद करणार? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: ST Strike | संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारचा 'मास्टरप्लॅन'?

loading image
go to top