MSRTC Strike | संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारचा नवा 'मास्टरप्लॅन'? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st strike

ST Strike | संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारचा 'मास्टरप्लॅन'?

मुंबई : देशातल्या सर्वांत मोठ्या परिवहन महामंडळांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी गेल्या जवळपास आठवड्यापेक्षा जास्त काळापासून संप पुकारला आहे. (MSRTC Strike) कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिवहन महामंडळाचे (MSRTC) तब्बल 126 कोटी 49 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. असे परिवहन मंडळाने म्हटले आहे. एसटीचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन तयार केल्याचे समजते.

येत्या चार दिवसात संप मोडून काढणार?

दरम्यान येत्या चार दिवसात संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन केल्याचे समजते. दरम्यान प्रशिक्षण पूर्ण झालेले २५०० नवे कर्मचारी सेवेत उतरवण्याच्या राज्य सरकार तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. ST कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता संपातील कर्मचाऱ्यांचे पगारही बंद करणार? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता पर्यत तब्बल 2,053 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, संप असाच सुरू राहिल्यास कारवाई आणखी कठोर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: MSRTC Strike : परिवहन महामंडळाचे तब्बल 126 कोटी रुपयांचे नुकसान

दररोज सरासरी 10 ते 25 कोटींचे नुकसान

राज्यात ST कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अशातच 96,000 कर्मचारी असलेल्या परिवहन महामंडळाला महाराष्ट्रात बस चालवता येत नसल्यामुळे, मंडळाला दररोज सरासरी 10 ते 25 कोटींचे नुकसान होत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान - ज्या कालावधीत कर्मचारी संपावर होते. त्या MSRTC चे 111कोटी 49 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काल एकाच दिवशी (ता.११) एमएसआरटीसीला तब्बल 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच राज्यातल्या 250 पैकी 225 आगारांमधले कर्मचारी संपावर गेल्यानं बहुतांश ठिकाणची एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे विशेषत: ग्रामीण भागातल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेही वाचा: ST Strike | नाशिकमध्ये 142 कर्मचाऱ्यांचे ST महामंडळाकडून निलंबन

loading image
go to top