Chitra Wagh on ED Action Sanjay Raut
Chitra Wagh on ED Action Sanjay Rautesakal

'जळफळाट, थयथयाटाचं कारण...', चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

मुंबई : ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता (ED Attaches Sanjay Raut Propery) जप्त केली आहे. १ हजार ३४ कोटीच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) माहिती दिली. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

Chitra Wagh on ED Action Sanjay Raut
ED ची मोठी कारवाई, संजय राऊतांची मालमत्ता जप्त

संजय राऊत यांचे अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. इतके दिवस चाललेला जळफळाट आणि थयथयाट, आदळआपट, शिव्यांची लाखोळी यांचं मूळ कारण हेच होतं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

ईडीने यापूर्वी संजय राऊतांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यांच्या मुलीच्या लग्नादरम्यान ही कारवाई झाली होती. माझ्या मुलीच्या लग्नातील फेटेवाल्यांची सुद्धा ईडीने चौकशी केली, अशी माहिती स्वतः संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या पत्रात दिली होती. त्यानंतर संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. याच प्रविण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती.

ईडीने छापेमारी केल्यानंतर काही महिन्यांनंतर आता राऊतांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. अलिबागजवळील किहीमधील ८ भूखंड आणि दादरमधील राहतं घर जप्त करण्यात आलं आहे. त्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ईडीने सर्व आरोप सिद्ध करून दाखवावे. ईडीने आरोप सिद्ध करून दाखवले नाहीतर मी राजकारण सोडून माझी सर्व संपत्ती भाजपच्या नावाने करेन, असं खुलं आव्हान देखील संजय राऊतांनी ईडीला दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com