
जे कधीच जनतेमधून निवडून आले नाहीत, असे लोक आता लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत
'कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोहोचलेल्या ऐतखाऊ...'
महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापलं आहे. दरम्यान, आज शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) चर्चा करा, असं थेट आव्हान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना केलं आहे. (maharashtra politics)
खासदार राऊत यांच्या या वक्तव्यांवर आता विरोधी गटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. ट्वीट करत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. (chitra wagh on sanjay raut)
हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या खेळीणे ठाणे पालिकेत आली होती सेनेची सत्ता, भाजपच्या स्वप्नांना सुरुंग
यात त्या म्हणतात, तुम्ही पुन्हा निवडून येऊनच दाखवा, असं संजय राऊतांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज केलं आहे. ज्यांनी आयुष्यात कधी जनतेमधून निवडणूक लढवली नाही कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोचले ते ऐतखाऊ जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत, असं म्हणत त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, आता यावर खासदार राऊत कोणती भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाजपच्या दिग्गजांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र वाघ यांच्या प्रतिक्रियेमुळे आता भाजप शिवसेना वाद चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा: मविआतून बाहेर पडायला तयार, पण..; राऊतांची एकनाथ शिंदेंना अट
काय म्हणाले आहेत खासदार राऊत ?
शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) चर्चा करा. बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये. आमदार आणि पक्ष यात फरक असून आमदार म्हणजे पक्ष नव्हेत, असं म्हणतानाच राऊतांनी शिंदे यांना टोला लगावला आहे.
Web Title: Chitra Wagh Criticized To Sanjay Raut On Shiv Sena Role Of Leave Maha Vikas Aghadi Govt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..