देवेंद्र फडणवीसांनी अख्खं राज्यसरकार घरी बसवलंय - चित्रा वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitra Wagh latest news

१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हिणवणाऱ्यांनो...

देवेंद्र फडणवीसांनी अख्खं राज्यसरकार घरी बसवलंय - चित्रा वाघ

एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केलं आहे. शिंदे यांनी पुकारलेल्या या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडल्या. बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालयही ठाम राहिलं. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट केलं आहे.

हेही वाचा: शिंदे सरकारची ताकद किती? फडणवीसांनी आकडेच मांडले!

यासंदर्भात वाघ म्हणतात, १०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हिणवणाऱ्यांना आता त्याच देवेंद्र फडणवीस यांनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय!, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केला आहे. दरम्यान, आता यामुळे पुन्हा एकदा भाजप शिवसेना वाद समोर आला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. यात फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भाजपाच्या साथीने शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मविआ सरकारमधले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अवघ्या काही वेळात त्यांचा शपथविधी होणार आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री; फडणवीसांचा मास्ट्ररस्ट्रोक

Web Title: Chitra Wagh Criticizes To Mahavikas Aghadi Govt On Devendra Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..