
महिला रेल्वे डब्यात पोलिस का नाहीयेत याचे रेल्वे मंत्रालयाने उत्तर द्यावे - चित्रा वाघ
चित्रा वाघ यांचा थेट केंद्र सरकारला प्रश्न; केली चौकशीची मागणी
राज्यात महिला सुरक्षेविषयी काही घटना समोर येत असतात. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान, भाजपाच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही यांसदर्भात वारंवार टीका करत काही विषयही समोर आणले आहेत. आताही अशाच एका मुंबईतील विषयावरून त्यांनी ट्विट करत रेल्वे मंत्रालयाला चौकशी करावी असे सुचवले आहे.
यात वाघ म्हणतात, महिला मुलींवरचे वाढते हल्ले पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा उपयोग काय आहे. महिला रेल्वे (Cetral Railway) डब्यात पोलिस का नाहीयेत याचे रेल्वे मंत्रालयाने उत्तर द्यावे. कित्येक वेळा महिला मुलींवर हल्ले झालेत बऱ्याचजणींना जीव गमवावे लागलेत, त्यामुळे याची चौकशी व्हावी असे आवाहन त्यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांना केले आहे.

काय आहे मुंबईतील ही घटना
एका महिलेने मुंबईतील (Mumabi) लोकल प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने रात्रीच्या वेळेस प्रवास करताना सुरक्षेसाठी महिला डब्यात पोलिस नाहीत त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं म्हटंल आहे. यात ती महिला सांगते की, मुंबईत रात्रीच्यावेळी लोकलनं प्रवास करताना महिला डब्यात कॉन्स्टेबल असणं बंधनकारक आहे. पण आज रात्री १० वाजताच्या सुमारास CSMT ते कल्याण लोकलमध्ये महिला डब्यात कॉन्स्टेबल उपस्थित नसल्याची तक्रार करणारा हा व्हिडिओ असून याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंती तिने केली आहे.
Web Title: Chitra Wagh Question To Central Govt To Railway Ministry Video Of Women Protection Local
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..