उजनीच्या बॅकवॉटर परिसरात चित्रबलाक पक्ष्यांचे यंदा आगमन झाले

chitrabalak
chitrabalak
Updated on

कळस - उजनीच्या बॅकवॉटर परिसरात व लगतच्या भादलवाडी (ता. इंदापूर) तलावावर विणीच्या हंगामासाठी दरवर्षी हजेरी लावणाऱ्या चित्रबलाक पक्ष्यांचे यंदा आगमन झाले आहे. त्यामुळे पुण्यासह परिसरातील पक्षिनिरीक्षकांची पावले उजनीकडे वळू लागली आहेत. 

राज्यात थंडी पुन्हा वाढणार; पुण्यात थंडी कमी

दरवर्षी येथे येणाऱ्या परदेशी पक्ष्यांमुळे इंदापूर तालुक्‍याला लाभलेल्या उजनी बॅकवॉटरच्या वैभवात भर पडत आहे. याशिवाय भादलवाडीचा ब्रिटिशकालीन तलाव पक्ष्यांसाठी वसाहतीचे सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींपैकी एक असलेल्या चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत येथे दरवर्षी फुललेली दिसते. यंदाही येथे चित्रबलाकांनी आपली घरटी थाटण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी या तलावातील दाट बाभळीच्या झाडांखाली पाणी नसल्याने पक्ष्यांनी आपला मुक्काम लगतच्या उंच झाडांवर केला होता. यंदा मात्र या झाडांखाली पाणी असल्याने पक्ष्यांनी घरटी थाटण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही महिने या पक्ष्यांचा मुक्काम येथे असेल. उजनी जलाशय व तलावात मुबलक मिळणारे खाद्यान्न, वसाहतीसाठी सुरक्षित ठिकाण यामुळे हे पक्षी हा परिसर दरवर्षी विणीचा हंगाम पार पाडण्यासाठी निवडतात. चित्रबलाक पक्ष्यांशिवाय येथे राखी बगळे, स्पून बिल, हळदी-कुंकू, पाणकावळे, शेकाट्या यांसारखे शेकडो प्रजातीचे पक्षी हजारोंच्या संख्येने येतात.

असा आहे चित्रबलाक
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, बांगलादेशात वास्तव्य
बाभूळ, चिंच, वड यांसारख्या उंच झाडांवर दाटीने घरटी बांधतात
चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी व लांब असते
चेहरा मेणासारखा पिवळा असून, त्यावर पिसे नसतात. 
याला रंगीत करकोचा असेही म्हणतात. 
स्वरयंत्र नसल्याने ते आवाज करू शकत नाहीत.

काही हौशी पर्यटकांकडून पक्ष्यांचे चांगले छायाचित्र मिळविण्यासाठी त्यांना हुसकाविण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यांच्या वास्तव्यात अडथळा आणणे योग्य नाही. अशा प्रकारांवर आळा घालणे गरजेचे आहे.
- ॲड. महेश कन्हेरकर, अध्यक्ष, स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com